ratnadurg killa mahiti रत्नदुर्ग किल्ल्याचा इतिहास

नमस्कार मित्रांनो सर्वांचं रत्नागिरी माहिती या ब्लॉग वरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो आपण पाहणार आहोत रत्नागिरीतील एक असं ठिकाण समुद्रकिनाऱ्यांनी व्यापलेला आहे ते म्हणजे रत्नदुर्ग किल्ला तर या ratnadurg killa mahiti मराठीमध्ये आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा लेख पूर्णपणे वाचा. 

तर मित्रांनो रत्नागिरी शहराजवळ असणारा हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला रत्नदुर्ग किल्ला हा एक मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक जलदुर्ग आहे. या किल्ल्याची रूप एका घोड्याच्या नालेसारखं आहे मित्रांनो हा किल्ला एकूण 120 एकर परिसरात पसरलेला आहे. मित्रांनो या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजाच्या काळात झालेली आहे. 

ratnadurg killa mahiti

निर्मिती आणि सुरुवातीचा काळ 

शिलाहार व बहमनी काळ 

मित्रांनो हा किल्ला इतिहासकारांच्या मते हा किल्ला शिलाहार कालीन असून इसवी सन 1205 च्या सुमारास याची निर्मिती राजाभोज यांनी केलेली आहे. त्यानंतर विजापूरच्या आदिलशाही आणि बहमणी राजवटीत मध्ये या किल्ल्याचे बुरुजांचे व तटबंदीचे बांधकाम करण्यात आले. 

भौगोलिक रचना 

ratnadurg killa mahiti

मित्रांनो या किल्ल्याची तुम्ही भौगोलिक रचना पाहिली तर तुम्ही थक्क व्हाल. मित्रांनो या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंना अथांग अरबी समुद्र व्यापलेला आहे आणि एका बाजूला जमीन आहे. हा किल्ला अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. मित्रांनो या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी एकूण 29 बुरुज बांधण्यात आलेले होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि मराठा साम्राज्य 

मित्रांनो हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे 70 मध्ये आदिलशाहीकडून हा जिंकून स्वराज्यात दाखल केला. तुम्हाला मित्रांनो माहीतच आहे महाराजांचे विचार थोर होते. त्या काळात महाराजांनी या किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्याची तटबंदी अधिक भक्कम केले मजबूत केली. 

मित्रांनो 18 व्या शतकात आरमाराचे मराठा प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात या गडाचा वापर आरमारी केंद्र आणि समुद्री चाच्यांवर नजर ठेवण्यासाठी केला जात होता.

पेशव्यांचा काळ आणि ब्रिटिश राजवट 

पेशव्यांचा काळ 

  • मित्रांनो पेशवे हे 1755 ते 1818 होते. मित्रांनो या काळात पेशव्यांच्या अधिकारात धोंडू भास्कर हे प्रतिनिधी होते यांनी या गडाची डागडुजी व दुरुस्ती केली.

1818 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 

  • मित्रांनो हा किल्ला 1818 मध्ये ब्रिटिशांनी तिसऱ्या इंग्रज- मराठा युद्धात मराठ्यांकडून हा किल्ला ताब्यात मिळवला 

मित्रांनो गडावर असणारी प्रमुख आकर्षक स्थळे 

श्री भगवती मंदिर 

  • मित्रांनो या निसर्गरम्य रत्नदुर्ग किल्ल्यावर श्री भगवती देवीचे भव्य मंदिर आहे या मंदिरामुळेच या किल्ल्याला भगवती किल्ला ही असे नाव दिलेले आहे व म्हणतात. आणि मित्रांनो या मंदिराचा जीर्नोद्वार सखोजी आंग्रे यांनी केला होता. 

द्वीपगृह 

  • मित्रांनो या गडाच्या एका टोकाला ब्रिटिशकालीन दीपगृह आहे जिथून समुद्राचा विहगम नजारा दिसतो हा नजरा पाहून तुम्ही थक्क व्हाल. 

भुयारी मार्ग 

  • मित्रांनो या गडावर प्राचीन कालीन चुपा भुयारी मार्ग समुद्रापर्यंत जाणारा आहे. यामुळे या गडावर पर्यटकांसाठी एक मोठं पर्यटन केंद्र आहे.

रत्नदुर्ग गडावर राहण्याची सोय आहे का? 

  • मित्रांनो खरंतर या गडावर राहण्याची सोय नाही. या गडापासून रत्नागिरी शहर खूप जवळ आहे या रत्नागिरी शहरात राहण्याची सोय आहे. 

गडावर जेवणाची सोय आहे का ?

  • मित्रांनो या गडावर वस्ती असल्यामुळे काही दुकाने व स्टॉल आहेत त्यातून दिवसभराचा पोटभरीचा गुजरात होऊ शकतो. 

रत्नदुर्ग गडावर पिण्याचे पाण्याची सोय आहे का ?

मित्रांनो या गडावर श्री भगवती देवी मंदिराच्या जवळ पिण्याचे पाण्याची व्यवस्था आहे. 

मित्रांनो रत्नदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील जे स्वर्ग म्हणतो ते कोकण आणि त्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील हे सोनं आहे. रत्नागिरी शहरापासून हा गड किल्ला दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. या गडावर अत्यंत सुंदर दिसणारा समुद्रकिनारा आणि श्री भगवती देवी मंदिर आहे. 

मित्रांनो या गडाची संपूर्ण माहिती मी स्वतः अनुभवून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. या लेखाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलेली ratnadurg killa mahiti जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा काही चूक असल्यास मला नक्की कळवा मला ती सुधारण्यास मदत होईल. असेच नवनवीन रत्नागिरी विषयक अपडेट साठी ratnagirimahiti.com या वेबसाईटला फॉलो करा.

Pankaj Varik
Pankaj Varik
Articles: 3

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *