mandangad taluka मंडणगड तालुक्यातील टॉप पर्यटन स्थळे व माहिती

मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील mandangad taluka हा अत्यंत दुर्गम आणि निसर्गरम्य ऐतिहासिक वारसा  लाभलेला तालुका आहे.  रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरे कडील टोकाला वसलेला हा तालुका आहे.  मित्रांनो या तालुक्याची सीमा आहे रायगड जिल्हा आणि अरबी समुद्राला जोडलेली आहे. या तालुक्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे  हिरवेगार जंगल विस्तीर्ण डोंगर रांगा आणि बारा महिने वाहणाऱ्या नद्या आहेत.  मंडणगड तालुक्याचे कोकणात समृद्ध सांस्कृतिक वारसा मुळे एक वेगळे आणि मानाचे  स्थान आहे.  उत्तर मित्रांनो या  मंडणगड तालुक्याची सविस्तर माहिती आपण पुढे या लेखात पाहणार आहोत.

mandangad taluka

 मंडणगड तालुक्याचे भौगोलिक स्थान आणि प्राकृतिक रचना

 मित्रांनो  या मंडणगड तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय हे मंडणगड शहरातच आहे.  सह्याद्रीच्या उपरांगा आणि अरबी समुद्राच्या डोंगराळ भागात  वसलेला हा संपूर्ण तालुका आहे. या मंडणगड तालुक्यातून भारजा आणि सावित्री नदी या दोन मुख्य  नद्यांचा प्रवाह आहे.  मंडणगड तालुक्याच्या उत्तर सीमेवरून सावित्री नदी वाहते आणि  ती पुढे बाणकोट जवळ अरबी समुद्राला जाऊन  मिळते. मंडणगड तालुक्यातील स्थानिक शेतीला या नद्यांमुळे मोठा आधार मिळाला आहे. 

मित्रांनो या तालुक्यातील हवामान इतर तालुका प्रमाणेच प्रामुख्याने उष्ण आणि दमट आहे.  पावसाळ्यात हा डोंगराळ भाग असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.  मंडळ तालुक्याचे मुख्य पीक भात  म्हणजे तांदूळ आहे.  त्याच  प्रमाणे या तालुक्यात डोंगराळ भाग असल्यामुळे हापूस आंबा काजू सुपारी आणि नारळाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. 

 मंडणगड तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व

मित्रांनो प्रदीर्घ ऐतिहासिक वारसा लाभलेला हा मंडणगड तालुका आहे.  मित्रांनो असे म्हटले जाते पूर्वी सावित्री नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर सागरी व्यापार  चालत होता. मित्रांनो जलमार्गाचे संरक्षण करण्यासाठी येथे म्हणजे मंडणगड तालुक्यात मजबूत किल्ले बांधण्यात आलेले आहेत. मित्रांनो येथील ऐतिहासिक किल्ल्यावरूनच मंडणगड मिळालेले आहे. मित्रांनो मंडणगड किल्ला हा शिलाहार राजवटीत किंवा राजा भोज यांनी  बाराव्या शतकात  बांधल्याचे मानले जात आहे. मित्रांनो 1661 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यात सामील केला होता. 

मित्रांनो मराठ्यांचे  सरलेख कान्होजी आंग्रे आणि जंजिराचे सिद्धी यांच्या ताब्यातही होता. मित्रांनो सध्या गडावर दोन मोठे तलाव आणि एक जुनी तोफ पाहायला मिळते त्याचबरोबर एक ऐतिहासिक गणेश मंदिर ही आहे. ब्रिटिशांचे आणि त्यांच्या अगोदर  डंचांचे  ऐतिहासिक बंदर होते. मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्याचे पहिले मुख्यालय ब्रिटिश राजवटीच्या काळात बाणकोट येथे बनवण्यात आले होते.      

मंडणगड तालुक्यातील धार्मिक स्थळे आणि पर्यटन ठिकाणे

 मित्रांनो  मंडणगड तालुका  अथांग निसर्गाने व्यापलेला आहे.  येथे अतिशय चांगल्या प्रकारची पर्यटन स्थळे आहेत.  मंडणगड तालुक्यात असणारे हे वेळास हे गाव जगात प्रसिद्ध आहे. ऑलिव्ह  रीडले हे कासव दुर्मिळ आहे तर या कासवाचे तिथे प्रजनन केंद्र आहे.  मंडणगड येथे दरवर्षी फेब्रुवारी एप्रिल दरम्यान कासव महोत्सव आयोजित केला जातो.  कासवांची पिल्ले आणि अनोखा महोत्सव पाहण्यासाठी देशभरातून विदेशातून लाखो  पर्यटक येतात. मराठा समाजाचे कारभारी नाना फडणवीस यांचे  मुळगाव म्हणूनही  वेळास हे गाव ओळखले जाते. मित्रांनो भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा  मंडणगड तालुक्यातील आंबडवे  गावातील आहेत.  मित्रांनो दापोली आणि मंडणगड  या दोन तालुक्यांच्या सीमेवर उन्हावरे गावातील नैसर्गिक गरम पाण्याचे झरे सुद्धा प्रसिद्ध आहेत.  मित्रांनो येथील भाविकांची  श्रद्धा अशी आहे की या पाण्यात गंधकाचे प्रमाण असल्याने येथे स्नान केल्याने त्वचेचे आजार बरे होतात. 

 मंडणगड तालुक्यातील गावांची  यादी (mandangad taluka village list)

अडखळ, अडखळवण, आंबडवे, आंबवली(मंडणगड), आंबवणे बुद्रुक, आंबवणे खुर्द, आसवले, आटले, बहिरावली, बामणघर, बाणकोट(मंडणगड), भामघर, भिंगलोळी, भोलावळी, बोरघर(मंडणगड), बोरखत, बुरी, चिंचघर(मंडणगड), चिंचळी, दाभट, दाहगाव, दहिंबे, दंडनगरी, दत्तनगर, देव्हारे, धामणी(मंडणगड), ढांगर, धुतरोळी, दुधेरे, गवळवाडी, घरडी, घोसाळे(मंडणगड), घुमारी, गोठे, गोवेळे, गोवळ(मंडणगड), गुडेघर, इस्लामपूर(मंडणगड), जांभुळनगर, जावळे, कादवण, कळकावणे(मंडणगड), कांटे, केळवट, केंगवळ, केरील, किंजळघर, कोंडगाव(मंडणगड), कोन्हवळी, कोणझर, कुडूक बुद्रुक, कुडूक खुर्द, कुंभाळे, कुंभार्ली(मंडणगड), लाटवण, लोकरण, माहू, मंडणगड, म्हाप्रळ, मुरदपूर, नारायणनगर, नारगोळी, नायणे, निगडी(मंडणगड), पाचरळ, पडवे, पालवणी, पाळे(मंडणगड), पालघर(मंडणगड), पंदेरी, पन्हाळी बुद्रुक, पन्हाळी खुर्द, पाट, पेवे, पिंपळगाव(मंडणगड), पिंपलोळी, रानावली, सडे, साखरी(मंडणगड), सावरी, शेडवई, शेणाळे, शेवरे, शिगवण, शिपोळे, शिपोळे बंदर, शिरगाव(मंडणगड), सोवेळी, सुरले, ताकावली, ताकेडे, तळेघर, ताम्हाणे, तेरडी, तिडे, तोंडली(मंडणगड), तुळशी(मंडणगड), उंबरशेत, उमरोळी(मंडणगड), उन्हावरे, वाडवळी, वाकवली, वाल्मिकी नगर, वालोटे, वेळास, वेरळ तर्फे नातु, वेरळ तर्फे वेशवी, वेशवी, विन्हे. 

mandangad taluka map

मित्रांनो mandangad taluka हा निसर्गाच्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही नक्की या तालुक्याला भेट द्या व तेथील पर्यटन स्थळे पाहून त्याचा अभ्यास करा.  या लेखात दिलेली ही संपूर्ण माहिती मी स्वतः  वर्णन करून दिलेली आहे.  जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. अशाच नवनवीन रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणांचे रहस्य माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या टेलिग्राम चैनल आणि व्हाट्सअप ग्रुप  व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. 

Pankaj Varik
Pankaj Varik
Articles: 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *