महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्हा हा अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा जिल्हा आहे. या रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी सहज आणि सोपा मार्ग म्हणजे रेल्वे. मित्रांनो ratnagiri railway station हे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात मोठे आणि प्रमुख रेल्वे टेशन आहे. व्यापाराच्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने या रत्नागिरी स्टेशनला खूप मोठे महत्त्व आहे. तर मित्रांनो या रत्नागिरी स्टेशन बद्दलची सविस्तर माहिती या लेखात आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
ratnagiri railway station
रत्नागिरी रेल्वे स्टेशन कोड (ratnagiri station code)
मित्रांनो रेल्वे विभागाकडून प्रत्येक रेल्वे स्टेशन ओळखण्यासाठी एक विशेष कोड दिला जातो. आपल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा अधिकृत कोड RN असा आहे. मित्रांनो ट्रेनचे लाईव्ह लोकेशन पाहण्यासाठी आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठी या कोडचा वापर केला जातो. रत्नागिरी स्टेशन वरून सुटणाऱ्या सर्व गाड्यांची माहिती मिळवण्यासाठी हा कोड टाकून माहिती मिळवू शकता. मित्रांनो हा कोड कोकण रेल्वेच्या मुख्य रेल्वे स्थानकापैकी अत्यंत महत्त्वाचा ओळखला जातो.
रत्नागिरी रेल्वे स्टेशन नकाशा (ratnagiri station map)
मित्रांनो वर दिलेल्या ratnagiri station चा नकाशाने प्रवाशांना त्यांना आवश्यक प्लॅटफॉर्म वरती जाण्यासाठी मदत मिळू शकेल. मित्रांनो वरती दिलेल्या गुगल मॅप प्रमाणे रत्नागिरी रेल्वे स्टेशन तुम्हाला सहज मिळू शकेल. जी लोक आपली प्रायव्हेट गाडी घेऊन येतात स्टेशन पर्यंत त्या गाड्यांसाठी पार्किंगची जागा या नकाशात स्पष्ट दिसत आहे. मित्रांनो खरंतर या नकाशाचा उपयोग नवीन प्रवाशांसाठी स्टेशनची माहिती मिळवण्यासाठी हा डिजिटल नकाशा खूप उपयोगी पडतो.
रत्नागिरी रेल्वे स्टेशन फोटो (ratnagiri station photo)

मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन हे त्याच्या निसर्गरम्य वातावरणामुळे खूप अतिशय सुंदर दिसते. पावसाळ्यात या रत्नागिरी स्टेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात. रत्नागिरी स्टेशन चा मुख्य इमारतीचा फोटो हा खूप सुंदर दिसतो. सोशल मीडियावर इंटरनेटवर रत्नागिरी स्टेशनचे अनेक फोटो पर्यटकांना तिथे आकर्षित करतात.
रत्नागिरी रेल्वे स्टेशन संपर्क क्रमांक (ratnagiri railway station contact number)
मित्रांनो सर्वात महत्वाची गरज म्हणजे संपर्क तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर संपर्क करण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक ०२३५२-२२८९५१ असा आहे. या फोन नंबर वरती तुम्ही फोन करून गाड्यांची चौकशी आणि आरक्षणाची माहिती घेऊ शकता. आणि त्याचबरोबर भारतीय रेल्वे चा राष्ट्रीय मदत क्रमांक १३९ आहे यावरती तुम्ही 24 तास कधीही फोन करू शकता. हा संपर्क क्रमांक वाईट प्रसंग आणि आपत्कालीन मदतीसाठी प्रवाशांच्या मदतीला खूप उपयोगी पडतो.
रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरील सुविधा (ratnagiri railway station facilities)
मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांसाठी खूप आधुनिक आणि नवीन सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिलं म्हणजे शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांना प्लॅटफॉर्म बदलण्याकरिता पूल बांधण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांना आवश्यक खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मेडिकल स्टोअर सुद्धा उपलब्ध आहेत.
रत्नागिरी रेल्वे वेटिंग रूम (ratnagiri station waiting room)
मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांना गाडीची वाट पाहण्यासाठी खूप मोठी वेटिंग रूम बांधण्यात आलेली आहे. आता रत्नागिरी रेल्वे स्टेशन जुन्यापधीचे राहिलेले नाही आता नवीन लुक मध्ये केलेला आहे. गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी वेटिंग रूम मध्ये बसण्याची भाकडे आणि पंख्याची सोय अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो महिला प्रवासासाठी स्वतंत्र अशी वेटिंग रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या प्रवाशांना रत्नागिरी स्टेशन वरती वस्ती करायची आहे त्यांच्यासाठी रिटायरिंग रूम ची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे तुम्ही राहू शकता. येथे तुम्ही तुमची तिकीट दाखवून एसी नॉन एसी रूम अतिशय कमी किमती बुक करू शकता. मित्रांनो याशिवाय स्टेशनवर आराम करण्यासाठी बेडची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे.
रत्नागिरी रेल्वे स्टेशन कशासाठी प्रसिद्ध आहे (What is Ratnagiri railway station famous for?)
मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी आणि सुंदर परिसरासाठी कोकण रेल्वेचं महत्त्वाचं स्टेशन मानलं जातं. या क्षेत्रात हापूस आंबा काजू मोठ्या प्रमाणात पीक घेतल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. मित्रांनो संपूर्ण भारत देशातील रेल्वे स्टेशन पैकी रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे स्वच्छ आणि निसर्गरम्य मध्ये एक नंबर मानले जाते.
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूम आहे का?(Does Ratnagiri railway station have a retiring room?)
होय, मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांना राहण्यासाठी रिटायरिंग रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रवासात दमलेले प्रवासी विश्रांती घेण्यासाठी ऑनलाईन किंवा स्टेशनवर जाऊन रूम बुक करू शकता.
रत्नागिरी शहर रेल्वे स्टेशन पासून किती दूर आहे?(How far is Ratnagiri from railway station?)
मित्रांनो मुख्य रत्नागिरी शहरा पासून रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे सहा किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशनवरून रत्नागिरी सिटी जाण्यासाठी आणि रत्नागिरी सुट्टी वरून रेल्वे टेशन ला येण्यासाठी ऑटो रिक्षा 24 तास उपलब्ध असतात. त्याचबरोबर आणि बसची सुविधा उपलब्ध आहे. साधारण रेल्वे स्टेशन पासून रत्नागिरी मुख्य सिटी पर्यंत जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटे वेळ लागतो.
मित्रांनो कोकण रेल्वेतील रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे अत्यंत महत्त्वाचे स्टेशन आहे. या स्टेशन वरती पूर्ण जिल्ह्याची लोक फास्ट ट्रेन साठी येतात. त्यासाठी स्टेशन खूप रत्नागिरी जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो या लेखात दिलेली माहिती जर तुम्हाला चुकीची वाटत असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. अशा नवनवीन रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि आवश्यक माहितीसाठी आणि ती माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा.
